भुसावळात हार्डवेअर दुकान फोडले; लाखोंचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील हार्डवेअरचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे ८ ते १० लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जितेंद्र बळीराम अहुजा रा. भुसावळ यांचे भुसावळातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमध्ये अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्यांचे जळगाव शहरात देखील दाने हार्डवेअर दुकान असल्यामुळे जळगाव दुकानासाठी लागणारा माल हे भुसावळातील दुकानातून ने-आण करत असतात. चुडी मार्केटच्या बाजूला भुसावळ महापालिकेच्या मालकीचे बंद मार्केट आहे. दरम्यान, आज्ञात चोरट्यांनी अशोक हार्डवेअरच्या पाठीमागे असलेल्या लहान लाकडी खिडकीतून प्रवेश करत सुमार विविध प्रकारचे साहित्य व वस्तू असा एकुण ८ ते १० लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोबत अहुजा यांनी लावलेले १० सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर देखील चोरून नेला. आज सकाळी दुकानातील काम दुकानावर सामान घेण्यासाठी आले असता दुकानात पाहिले असता दुकानातील सर्व सामानांची फेकाफेक केलेले दिसून आले. दुकानात चोरी झाल्याचे कळता मालक जितेंद्र अहुजा हे दुकानात दाखल झाले. भुसावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या बंद मार्केटमध्ये मध्यरात्री काही टवाळखोर तरूण अफू व गांजा पिऊन धुमाकुळ घालत असतात. त्यांनीच ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

Protected Content