देवीची मुर्ती व पादुका चोरी प्रकरणातील संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रेमनगरातील श्री सप्तश्रृंगी मंदीरातून देवीची मुर्तीसह पितळी पादुका चोरून नेल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात दाखल  गुन्ह्यातील संशयित आरोपीला गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सराफ बाजारातून पोलीसांनी अटक केली आहे.

 

जळगाव शहरातील प्रेमनगरात श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. या मंदीरात पंचधातूची देवीची मुर्ती व पादुका ठेवण्यात आलेल्या होत्या. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदीरात ठेवलेली २५ हजार रूपये किंमतीच पंचधातूची देवीची मुर्ती आणि ९०० रूपये किंमतीच्या पादूका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सराफ बाजार परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी तुषार रामचंद्र भारंबे (वय-३८) रा. शिवकॉलनी, जळगाव याला सराफ बाजारातून अटक केले. त्यांच्याजवळून चोरी केलेली देवीची मुर्ती आणि पादुका हस्तगत केली आहे.

 

ही कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सलिम तडवी, रविंद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, कमलेश पवार, पोकॉ. कैलास शिंदे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास  महिला पोहेकॉ भारती देशमुख करीत आहे.

 

Protected Content