कुसुंबा येथे अवैध दारू विक्रेत्याला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील तुळजानगरात अवैध देशी दारूची विक्री करणारा आकाश प्रेम तवर (वय-२२) याला एमआयडीसी पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसंबा गावातील तुळजामाता नगर परिसरात आकाश तवर हा संशयित आरोपी बेकायदेशीर व अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकातील पोहेकॉ गफ्फार तडवी, शांताराम पाटील, पो.कॉ. सिध्देश्वर डापकर, होमागार्ड धिरज भगत यांनी आज बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता कुसुंबा गावातील तुळजानगर परिसरात जावून कारवाई करत संशयित आरोपी आकाश प्रेम तवर (वय-२२) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव याला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील दीड हजार रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. पो.कॉ. सिंध्देश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content