भालोद येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ‘मोफत कायदे विषयक’ शिबीर

यावल प्रतिनिधी । यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यातील भालोद येथे आज ६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत पातळीवर कायदेविषयक माहिती व सल्ला मिळण्यासंदर्भात शिबीर घेण्यात आले.

या शिबीरात यावल विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एम. एस. बनचरे यांनी मेडीशनबाबत कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश व्ही .एस .डामरे यांनी स्त्री विषयक कायदा, ॲड. जी. एम. बारी यांनी ग्राहक कायदा व ग्राहकांचे अधिकार , ॲड. एन.पी.पाटील यांनी आरोपीचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.
यासह मध्यस्थी तडजोड, महाराष्ट्र विधी सेवा समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ॲड. आकाश चौधरी आणि ॲड. हेमांगी चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी यावल दिवाणी न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एस. बनचरे, सह दिवाणी न्‍यायाधिश व्ही. एस. डामरे, यावल वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धीरज चौधरी, यावल वकील संघाचे विधिज्ञ जी.एम. बारी, एन. पी. पाटील,  व्ही. एम. परतणे, डी. सी. सावकारे, आकाश चौधरी, हेमांगी चौधरी यांच्यासह  सरपंच श्रीराम कोळी, उपसरपंच कामिनी जावळे, ग्रामसेवक संदीप गोसावी, समांतर विधी सहाय्यक वारुळकर, बढे , अग्रवाल व फेगडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे कर्मचारी के. के. लोंढे, डी.ए. गावंडे, मुकुल जोशी, जी. एस. लाड, पंचायत समितीचे वाहनचालक रुबाब तडवी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content