वरणगाव भोगावती नदीच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा; आ.सावकारेंच्या प्रयत्नाला यश

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी लवकर २ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने सुशोभीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरणगाव भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी यासाठी वरणगाव नगरपरिषदेला २०१८-१९ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, आ. संजय सावकारे यांनी ५ कोटीचे बक्षिस जाहीर केले होते. त्या ५ कोटी ३२ लाख ७७ हजार २३२ रुपयांच्या मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून भोगावती नदीच्या सुशोभीकरण करण्याचा ठरवा मंजूर केला होता. ५ कोटी ३२ लाख ७७ हजार २३२ रकमेला २०१९ ला मान्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यांनी दिली होती. मात्र नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक होती. त्यानुसार नगरविकास विभागाच्या  मान्यते साठी २३ जानेवारी २०२० ला प्रस्ताव पाठविला होता. ३ मार्च २०२१ ला मान्यता दिली होती. मात्र नगरविकास विभाग व नगरपरिषदेच्या तांत्रिक बाबी अपूर्ण होत्या. त्या पूर्ण केल्या. भोगावती नदीचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी भाजपाने वारंवार आंदोलने उभी केली होती. याबाबत माजी मंत्री आ. संजय सावकारे यांच्याकडे सोमवारी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मंत्रालयाची मान्यतेच्या पत्राचा प्रश्न मार्गी लावावा, असे झालेल्या बैठकीत मागणी केली.

आज आ. सावकारे यांनी नगरविकास विभागात जाऊन उपप्रधान सचिव पो. जो. जाधव यांच्याकडे जाऊन भोगावती नदीच्या शुशोभीकरणा प्रश्न मार्गी लावावा अश्या सूचना केल्या. त्याप्रमाणे आज प्रश्न मार्गी लागला . आता वरणगावकरांसाठी भोगावती नदी सुशोभीरणाचा प्रश्न मार्गी लागणार असून लवकरच २ कोटी ५० लाखाचे टेंडर निघणार असून दोन्ही बाजूने संरक्षण भिंत व घाट बांधले जातील. वरणगावच्या सौंदर्यात भर पडणार असून भोगावतीचा संकल्प पूर्ण होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, नगरसेविका माला मेढे, मेहणाज पिंजारी यांनी यावेळी पत्रकरांना माहिती दिली.

Protected Content