संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा उल्लेख

 

संयुक्त राष्ट्र: वृत्तासंस्था । संयुक्त राष्ट्र संघाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणे हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना महागात पडले. भारताच्या प्रतिनिधींनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देताना चांगलेच सुनावले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवत संयुक्त राष्ट्र संघाच्या अपयशावर भाष्य करताना काश्मीर आणि पॅलेस्टाइनच्या मुद्याचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्र संघाचे सभासदत्व मिळावे अशीच अनेक देशांनी इच्छा होती. मात्र, जम्मू-काश्मीर आणि पॅलेस्टाइनचा मुद्दा अजूनही तसाच आहे. या दोन्ही ठिकाणचे नागरीक न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. कुरेशी यांच्या या वक्तव्याला भारताने आक्षेप घेत पाकिस्तानला सुनावले.

संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैइत्रा यांनी म्हटले की, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि शहीदांचाही दर्जा देतो. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. पाकिस्तानने या मंचाचा वापर कायम असत्य सांगण्यासाठी आणि खोटे आरोप लावण्यासाठी केला आहे. भारत जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचे आरोप हे भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबतचे काल्पनिक विचार आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाचा कोणताही अजेंडा हा दहशतवादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दहशतवादाचा पूर्णपणे खात्मा करणे हे संयुक्त राष्ट्र संघाच्या अजेंड्यावर आहे. पाकिस्तान हा देश दहशतवादाचे केंद्र म्हणून जगभरात प्रसिद्ध असल्याकडेही मैइत्रा यांनी लक्ष वेधले.

Protected Content