कोरोनाचा जोर ओसरण्याची लक्षणे ?

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ५५ लाखांच्या पुढे गेलाय. प्रत्येक दिवशी जवळपास ९५ हजार संक्रमित सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली होती. पण हाच आकडा आता ७५ हजारांवर आल्यानं प्रत्येक दिवशीचा संक्रमितांचा आकडाही घसरताना दिसतोय.

देशातील एकूण संक्रमितांचा आकडा ५५ लाख ६२ हजार ४८३ वर पोहचलाय. तरकोरोना मृत्यूचा आकडा ८८ हजार ९३५ वर पोहचलाय. आत्तापर्यंत देशातील ४४ लाख ९७ हजार ८६७ जणांनी कोरोनावर विजय मिळवलाय. देशाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) ८०.८६ टक्क्यांवर आहे. सध्या १७.५४ टक्के अर्थात ९ लाख ७५ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील मृत्यू दर १.५९ टक्क्यांवर आहे तर पॉझिटिव्हिटी रेट (एकूण चाचण्यांपैंकी पॉझिटिव्ह आढळलेली संख्या) ८.०२ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ९ लाख ३३ हजार १८५ सॅम्पल्सच्या चाचण्या पार पडल्या. देशात आत्तापर्यंत एकूण ६ कोटी ५३ लाख २५ हजार ७७९ सॅम्पसची चाचण्या पार पडल्या आहेत.

Protected Content