उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात

मुंबई: वृत्तसंस्था । थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. सर्व प्रकारची काळजी घेत होते. अतिवृष्टग्रस्त भागांचा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. ‘देवगिरी’ निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते. खबरदारी म्हणून घरात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पार्थ म्हणाले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Protected Content