Home राजकीय मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

0
57

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मराठयानां ओबीसीतून आरक्षण देत नाही, सगेसोयरे लागू होऊ देत नाही, कुणालाही मोठे होऊ देत नाही, त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये विभाजन झाले आहे, खडसे व पटोले त्यांच्यामुळेच भाजप सोडून गेले अशा प्रकारचे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांवर केले आहे.
त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे येण्यास निघाले. त्यांना व्यासपीठावर लोकांनी येऊन समजवले. पण ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. त्यांना माध्यामांनी मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ असे बोलून त्यांनी यावर बोलणे टाळले.


Protected Content

Play sound