छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने नक्षलग्रस्त भागात गेल्याकाही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांचा वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात एका मोठ्या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. छत्तीसगढ राज्यातील बिजापूर जिल्हयात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे.
या चकमकीत सुरक्षा दलाच्या पोलिसांनी १२ नक्षलवाद्याचा खात्मा केला. ही चकमक पीडिया जंगलात झाली आहे. पीडिया जंगलातील नक्षलवाद्यांचा तळ सुरक्षा दलांच्या जवानांनी नष्ट केला असून या कारवाईमध्ये पोलिसांनी घटनास्थळावरून मोठया प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. यासोबतच या कारवाईत दोन जवान जखमी झाले आहे.

Protected Content