राहूल गांधी हे नर्व्हस व अपरिपक्व नेतृत्व : बराक ओबामांच्या नवीन पुस्तकात उल्लेख !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अ प्रॉमिस्ड लँड या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे नर्व्हस व अपरिपक्व नेतृत्व असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने याचे देशाच्या राजकारणात पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बराक ओबामा यांनी आपल्या अ प्रॉमिस्ड लँड या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.

दरम्यान, बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. काँग्रेसच्या या दोन नेत्यांबाबतच्या उल्लेखामुळे यावरून आता राजकीय वाद-प्रतिवाद होण्याचे संकेत मिळाले आहेत.

बराक ओबामा हे २०१७ मध्ये भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता. यानंतर आता याच ओबामा यांनी त्यांच्याबाबत नोंदविलेले निरिक्षक राजकीय वर्तुळात नव्या वादाला निमंत्रण देण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

Protected Content