मी कुठल्याही पक्षात जाणार नाही; ठाकरे गट सोडलेल्या सुरेश जैन यांचा मोठा निर्णय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावचे माजी आमदार आणि मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी एक्सप्रेसने मुंबईहून जळगावात आले. शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली आहे. मात्र सुरेश जैन यांनी मोठा निर्णय घेत सर्व चर्चेना पूर्ण विराम लावला आहे.

सुरेश जैन यांनी आपण सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून राजकीय संन्यास घेतला आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्ष आपले फोटो वापरत असल्याने अनेक पक्षात मी कोणाच्या बाजूने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे आपण राजकारणाचा संन्यास घेत असून या पुढे कोणत्याही पक्षात जाण्याचा किंवा राहण्याचा प्रश्न नाही. वाढते वय आणि प्रकृतीनुसार हा निर्णय घेतल्याचे सुरेश जैन म्हणाले. सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ते काही समाधानकारक नाही.गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात असल्याने प्रत्येक जण आपल्याशी जुळला होता. आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून माझा सर्व पक्षांना पाठिंबा असल्याचे स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिले आहे.

Protected Content