कृष्णप्पा गौतमचा नवीन विक्रम

krishnappa gautam

बेंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराउंडर कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमिअर लीग २०१९ मध्ये धम्माल उडवून दिली आहे. दि. 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात त्याने ८ विकेट घेत ३९ चेंडूत वेगवान शतक ठोकण्याचा नवीन विक्रम नोंदविला आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णप्पा गौतमची कामगिरी ही टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, केपीएल सामन्यांना टी-२० म्हणून दर्जा नाही. कृष्णप्पाने एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ३९ चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानं ५६ चेंडूत एकूण १३४ धावा केल्या. त्यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. कर्नाटक प्रीमिअर लीग संघाकडून हे आतापर्यंतचं सर्वाधिक वेगवान शतक आहे. फलंदाजीबरोबर त्यानं गोलंदाजीतही सरस कामगिरी केली. त्यानं ४ षटकांत ८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या जादुई फिरकीपुढं शिवमोगा लायन्सचे फलंदाज टिकूच शकले नाहीत.

Protected Content