जिल्हाधिकारी ढाकणे यांची पिंपरूड शेती शाळेस भेट

WhatsApp Image 2019 08 25 at 1.52.07 PM

फैजपूर, प्रतिनिधी | पिंपरुड येथे कृषी विभागामार्फेत पिकावरील रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉप सँप) अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा सुरू आहे. ह्या प्रकल्पास वर्ग क्रमांक सात ला जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी शनिवारी भेट दिली.

जिल्हाधिकारी ढाकणे यांनी शेतकऱ्यांना पारंपारीक शेती बद्दल सखोल मार्गदर्शन केले. यात अंबाडी , उडीद -मूग , मका , भेंडी , चवळी , झेंडू , या सारखी आंतर पिक व सापळा म्हणून लावावी, ज्यामुळे मानवीय आहारात डाळी व घरचा ताजा भाजी-पाला उपलब्ध होऊन विषमुक्त अन्न मिळेल असे सांगितले. तसेच यामुळे कापूस पीकावरील कीड व रोग याची तीव्रता कमी होईल. रासायनिकतेचा वापर कमी होऊन व शुध्द वातावरण निर्मिती होईल.व ते मानवी जीवनाला उपयुक्त ठरते. सोबत उपस्थित शेतकऱ्यांनी शेती पिका विषयी अधिकाऱ्यांशी हितगुज केली. हा कापसाचा प्रकल्प दिलीप चौधरी यांच्या शेतात घेण्यात आला. एकंदरीत कापसाची गुणवत्ता बघून जिल्हाधिकारी ढाकणे यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सीईओ बी. पी. पाटील, कृषी जिल्हा अधिक्षक संभाजी ठाकूर , उपसंचालक अनिल भोकरे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, पिंपरुड सरपंच नंदकिशोर चौधरी, सदस्या किरण कोल्हे, राकेश कोल्हे यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content