रब्बी पिकांसाठी पाटातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकासाठी पाटाला पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी धरणगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा चांगला पावसामुळे पाण्याचा साठा मुबलक प्रमाणावर आहे. धरणगाव तालुक्यात रब्बी हंगाम पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी झाली आहे. पाण्याअभावी पिके काढणे अशक्य असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे रब्बी हंगाम पिकासाठी पाटाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येते, दरम्यान यावर्षी देखील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिकांची पेरणी केली आहे. या मका, गहू, हरभरा यासह आदी पिके पेरली आहे. या पिकांना पाटाच्या माध्यमातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, पाटचाऱ्या दुरुस्त करावे, तसेच रब्बी हंगाम घेण्यासाठी किमान ५ आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धरणगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष तथा युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शरद माळी, राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ, भरत महाजन, भागवत चौधरी, धीरेंद्र पुरभे, पप्पू कंखरे, लक्ष्मण माळी यासह आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1517112135469301/

Protected Content