मविआचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रोहिणी खडसे मैदानात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील कर्की,धाबे पिंप्री, पिंप्री पंचम, कोठा, नायगाव, पिंप्रीनांदू, बेलसवाडी, बेलखेड, धामणदे, भोकरी, नरवेल, पातोंडी या गावांमध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते यावेळी प्रचार रॅली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटिल आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते सर्वांनी मतदारांना अनुक्रमांक तिन वरील श्रीराम पाटिल यांच्या नावासमोरील “तुतारी वाजवणारा माणुस” या चिन्हाचे बटण दाबुन श्रीराम दादा पाटिल यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या सत्ताधारी हे उद्योगपती धार्जिणे असुन देशातील सामान्य जनता, तरुण, महिला, शेतकरी हिताच्या विरोधी आहेत.

सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती पण उलट आपल्या राज्यातील रोजगार इतरत्र राज्यात पळवून तरुणांच्या हाताचे काम हिसकावण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले. महागाई, गॅसचे दर कमी करण्याची घोषणा केली होती पण याउलट गॅस ,किराणा व इतर जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ करून सामान्य जनतेला संसाराचा गाडा चालवणे मुश्किल केले. सत्ताधाऱ्यांनी शेतमालाच्या हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती परंतु भावात वाढ तर केली नाहीच याउलट शेतीसाठीचे बि-बियाणे खते व इतर आवश्यक वस्तूंच्या किमती चौपट करून शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढायचे आणि त्याच पैशांतून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची असा फसवा खेळ सुरू केला आहे.

काँग्रेसच्या कार्यकाळात देशात शेतीचे यांत्रिकीकरण झाले. सरकारने शेतकऱ्यांना शेती अवजारांवर, ट्रॅक्टरवर सबसिडी दिली. त्यामुळे शेतीची मशागत करणे सोयीचे झाले याचा शेती उत्पादन वाढीसाठी मोठा हातभार लागला. परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी शेती साहित्य व शेती अवजारांवर जि. एस. टी. कर लावला त्यातून त्यांच्या किंमती वाढल्या. पेट्रोल, डिझेल चे दर कमी करण्याचे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते ते कमी न करता उलट वाढवले वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती मुळे शेतीची नांगरणी वखरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा दर ताशी हजार ते बाराशे रुपयांपर्यंत पोहचला त्यामुळे आता ट्रॅक्टर द्वारे शेती ची मशागत करणे सामान्य शेतकऱ्यांना न परवडण्या सारखे झाले आहे म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात शेती मशागत करण्यासाठी परत एकदा बैलांवर नांगर जुंपण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे म्हणुन आता सामान्य नागरिक, महिला,तरुण, शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदानातून एल्गार पुकारून तुतारीची ललकारी बुलंद करा व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांना मतदान करून त्यांना बहुमताने विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. विनोद तराळ यांनी श्रीराम पाटिल हे आपल्यातील एक सामान्य माणूस असुन त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे.आपले केळी पिक विमा, सिंचन,आरोग्य, रस्ते दळणवळण, व इतर प्रश्न संसदेत मांडण्यासाठी श्रीराम पाटिल यांना मतदान करून त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवा असे मतदारांना आवाहन केले.

डॉ जगदीश पाटिल यांनी श्रीराम पाटिल हे उद्योजक असुन ते मतदारसंघात नवनवीन उद्योग आणुन तरुणांना रोजगार देऊ शकतात त्यासाठी त्यांना निवडून देण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटिल, माजी सभापती विकास पाटिल, दत्ता पाटिल,अतुल पाटिल, लता ताई सावकारे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content