खा.रक्षाताई खडसे यांची राज्य कार्यकारणीत निवड ; नाथाभाऊंची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण

जळगाव (प्रतिनिधी) भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. या कार्यकारणीत रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.रक्षाताई खडसे यांची भाजप प्रदेश मंत्रीपदी (चिटणीस) निवड करण्यात आली आहे. तर एकनाथराव खडसे यांची प्रदेश कार्यकारणीत विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

 

महाराष्ट्र भाजपची कार्यकारणी जाहीर आज करण्यात आली आहे. या कार्यकारणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहे. दरम्यान, कार्यकारणीतून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना साईड ट्रॅकला टाकण्यात आले आहे. खडसे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बोळवण करण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना तर वगळण्यातच आले आहे. तर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आलीय. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. अगदी पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या १०० टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असे चंद्रकांत पाटील यांनी काही वेळापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. परंतू ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत त्यांनी कुठलेही वक्तव्य केलेले नाही. नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. थोडक्यात पुन्हा एकदा एकनाथराव खडसे यांना साईड ट्रॅकला टाकण्यात आले आहे.

Protected Content