सिंचनाचा चाळीसगाव पॅटर्न निर्माण करणार – मंगेश चव्हाण

mangesh dada

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुका सुजलाम् व सुफलाम् करण्यासाठी सिंचन क्षेत्राचा विकास होणे महत्वाचे आहे. या सिंचन क्रांतीसाठी जलसिंचनाचा शिरपूर पॅटर्न सारखा चाळीसगाव पॅटर्न राबवणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी टाकळी प्र.चा. करगाव गटातील विजय संकल्प मेळाव्यात केले. हा मेळावा टाकळी प्र.चा करगावातील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्याला जर समृद्ध करायचे असेल तर त्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पाणी हेच पाणी पाटचारीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पुरवण्याचा काम करून इथवर न थांबता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव देण्यासाठी कटिबद्ध राहील. त्याचबरोबर टाकळी प्र.चा. गावात भुयारी गटारी तयार करू यासाठी फक्त मायबाप जनता, तरुण मित्रांची सर्वांशी खंबीर साथ द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी चित्रसेन पाटील यांनी उद्योगाच्या क्षेत्रात चाळीसगावची भरभराट मंगेश चव्हाण नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त केला. आनंद खरात यांनी सांगीलते की, रिपाईचा हर एक खंदा कार्यकर्ता चव्हाण यांच्यासोबत व शहराच्या विकासात अग्रेसर राहील. यासोबतच दिनकर राठोड, शेषराव पाटील, अलकनंदा भवर, अनिल महाजन यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्ष सांगेल तो मार्ग निवडत त्या मार्गावर चालण्याचे काम आपण सर्वांनी करायला हवे, पक्ष प्रत्येकाला योग्य तो न्याय देतो. मंगेश चव्हाणांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे काम पक्षाने आपल्यावर सोपविले आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम करू या असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, तालुका अध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, भाजपा किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, आरपीआयचे लोकसभा प्रमुख आनंद खरात, पं.स.सभापती दिनेश बोरसे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील, किशोर पाटील ढोमनेकर, न.पा गटनेते संजय पाटील, भाजपा सरचिटणीस धनंजय मांडोळे, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, भाजपा ओबीसी नेते अनिल महाजन, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी पं.स.सदस्य जगन्नाथ महाजन, अनिल नागरे, मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड, अलकनंदा भवर, सरदारशेठ राजपूत, किशोर पाटील, विश्वजित पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, चंद्रकांत तायडे, चिरागुद्दीन शेख, बापू अहिरे, जेष्ठ कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, उपसरपंच संदीप स्वार, दिलीप चौधरी, उत्तम राठोड, निवृत्ती कवडे, दिनकर राठोड, हेमंत पाटील, विजय पवार यांच्यासह सर्व आजी माजी जि.प. व पं.स.सदस्य, मार्केट कमिटी सदस्य, नगरसेवक, गट-गणप्रमुख, शक्तिकेंद्र व बूथप्रमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय मांडोळे यांनी प्रास्ताविक केले. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मंगेश चव्हाण मित्रपरिवाराने आभार मानले.

Protected Content