पुलवामा हल्याप्रकरणी अजित डोवाल यांची चौकशी करा : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत.अजित डोवाल यांची कसून चौकशी झाली ना तर काय प्रकरण होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडतेय, हे सगळे बाहेर येईल, असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे.

 

राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठे घडवले जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये एका वाहिनीचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे म्हणाले, आजच्या सरकारच्या काळात वर्तमानपत्रं, वाहिन्या, सीबीआय, रिझर्व्ह बँक, पोलीस, लष्कर या सगळ्यांमध्ये दोन गट झालेत. हे लक्षण देशासाठी चांगले नाही. निवडणुकीच्या तोंडावर युद्धाच्या, काश्मीरच्या बातम्या सुरू झाल्या आणि चार-साडेचार वर्षं ज्यावरून आरडाओरड सुरू होती, ते विषय बंद झाले. नीरव मोदी, चोक्सी ही लोकं मोदींच्या काळात हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाली. त्यावेळी श्रीदेवी गेल्याची बातमी आली आणि सगळ्या बातम्या बाजूला पडल्या. आता पुलवामा हल्ल्याच्या बातम्या सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान एवढेच तुमच्यापुढे उभे केले जातेय.अजित डोवाल यांची कसून चौकशी झाली ना तर काय प्रकरण होतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडतंय, हे सगळं बाहेर येईल.

Add Comment

Protected Content