भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले; दोन पायलट शहीद

helicopter news

थिम्पू वृत्तसंस्था । भूतानमध्ये भारतीय लष्कराचे चीता हे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन पायलट शहीद झाले आहेत. लष्कराच्या ट्रेनिंग टीमचे हे हेलिकॉप्टर असल्याचं सूत्रांनी सांगितले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूतानच्या योंगफुला येथे आज दुपारी १ वाजता ही घटना घडली. अरुणाचल प्रदेशाच्या खिरमू येथून योंगफुलाकडे जात असताना हे विमान कोसळलं. त्यात दोन पायलट शहीद झाल्याचं आर्मीचे प्रवक्ते, कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं.

विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याची देशातील ही या वर्षातली ११ वी घटना आहे. वर्षभरात ९ लढाऊ विमाने आणि २ हेलिकॉप्टर कोसळले असून त्यात १२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळच्या नांदगावात तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील एक महिला जखमी झाली होती, तर तीनजण जखमी झाले होते.

Protected Content