पाक दहशतवाद्यांचा समुद्रमार्गे हल्ल्याची दाट शक्यता- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

rajnath singh

कोल्लम वृत्तसंस्था । पाकिस्तानचे प्रशिक्षित अतिरेकी समुद्री मार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतात मोठा घातपात घडवून आणण्याचा या अतिरेक्यांचा इरादा आहे. याला भारतीय सेना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी अतिरेकी हल्ल्याची शक्यता वर्तवली. भारताला त्रास देणाऱ्यांना आम्ही सुखाने जगू देणार नाही, असं सांगतानाच बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवणही राजनाथ सिंह यांनी यावेळी करून दिली. कच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर अतिरेकी हल्ला करणार नाहीत, असं समजणं योग्य ठरणार नाही. मात्र अतिरेक्यांच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सागरी संरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं राजनाथ यांनी स्पष्ट केलं. पुलवामा हल्ल्यात आमचे काही जवान शदीह झाले. त्याचा बदला म्हणून आपण पाकिस्तानच्या बालाकोटवर हल्ला केला, याची आठवण करून देतानाच शहिदांचे बलिदान वाया जाणार नाही, असेही राजनाथ म्हणाले.

दरम्यान, भारताने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वक्तव्यांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला होता. ‘नो फर्स्ट यूज’ हे भारताचं अण्वस्त्रांबाबतचं धोरण आहे. परंतु, भविष्यात काय होईल, हे परिस्थितीवरच अवलंबून असेल, असा अप्रत्यक्ष इशाराच राजनाथ सिंह यांनी पाकला दिला होता.

Protected Content