पाडळसरेच्या संघर्षाला वाढता पाठींबा; पत्रकार संघही सोबत ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणासाठी सुरू असणार्‍या आंदोलनास वाढता पाठींबा मिळत असून आज आजी-माजी आमदारांसह पत्रकार संघानेही याला पाठींबा दिला आहे.

पाडळसरे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज आ.शिरीष चौधरी, माजी आ.डॉ. बी.एस.पाटिल यांनीही आज आंदोलनास पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनीही याआंदोलनात उडी घेतल्याने धरण आंदोलनाने जनांदोलनाचे स्वरूप धारण केले आहे.आंदोलनास ६ दिवस झालेतरी निम्नतापी प्रकल्प पाडळसेच्या एकाही अधिकार्‍याने आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी जाहिर निषेध नोंदविला.

आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी आंदोलनास संबोधित करतांना सांगितले की, मीदेखील धरण समितीचा आंदोलक असून मी आंदोलनासोबत आहे. माजी आ.डॉ.बी.एस.पाटिल यांच्या कार्यकाळात धरणाला १२१.५६ कोटी रुपये प्राप्त झालेले होते. कृषिभूषण साहेबराव पाटिल यांच्या कार्यकाळात १३९.कोटी९७ लक्ष रुपये मिळाले तर माझ्या कार्यकाळात आतापर्यंत २००कोटी.८२ लक्ष रुपये प्राप्त झाले आहे. मात्र राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा मर्यादित व तोकडा आहे. म्हणून केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्नपूर्वक जलआयोगाची मान्यता मिळविली. आता नाबार्ड कडून १५०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करून पाठपुरावा सुरू आहे. प्रसंगी प्रश्‍नावर धरण जनआंदोलन समितीला मुख्यमंत्री यांच्या भेटीला घेऊन जाऊ असे सांगितले. आ.डॉ.बी.एस.पाटिल यांनी धरणाचा इतिहास मांडला.सर्वपक्षीय लोकांनी त्यागाची भूमिका घेऊन पाडळसरे धरण या एकाच विषयासाठी झटावे ! असे आवाहन केले.

दरम्यान, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी,धरण म्हणजे तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे आहे म्हणून पत्रकार आंदोलनात उतरले आहे असे सांगितले. समितीचे माजी प्रभारी कुलगुरू शिवाजीराव पाटिल यांनी आंदोलनाची भूमिका लोकप्रतिनिधी समोर मांडली. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील, जितेंद्र ठाकूर, चंद्रकांत काटे,किरण पाटिल,उमेश काटे,उमेश काटे, मुन्ना शेख,महेंद्र रामोशे,गौतम बिर्‍हाडे, जयेश काटे, सुखदेव ठाकूर,भटू वाणी, योगेश महाजन,विवेक अहिरराव,सदानंद पाटिल, विजय सुतार,आबिद शेख, .पी.के.पाटिल, प्रा.विजय गाडे, डॉ.युवराज पाटिल, उमेश धनराळे, सत्तार पठाण यांच्यासह सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने आंदोलनाचे बळ वाढले असल्याची भावना समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटिल यांनीही सचिन पाटिल व सहकार्‍यांसह उपस्थिती लावली. यावेळी अमळनेर तालुका सरपंच सेवा संघ अध्यक्ष जितेंद्र पाटिल, सचिव प्रा.सुनिल पाटिल,कार्याध्यक्ष प्रा.पी.के.पाटिल,डी.एम.पाटिल यांचेसह अमळनेर तालुका सिड्स पेस्टीसाईड्स फरतीलयझर असोसिएशन योगेश पवार,प्रशांत भदाणे, मुन्ना पारख,ललित ब्रम्हेचा,मुस्तफा बोहरी,भानुदास पाटिल,दिपक पाटिल,तेजस जैन,रविंद्र पाटिल,किरण पाटिल,राकेश महाजन आदिनीही पाठींबा देऊन उपोषणात सहभाग नोंदवला.जीवन फाउंडेशन भुसावळचे ईश्‍वर मोरे, सुंदरपट्टी,हेडावे, शहापूर ,जनसेवा फाउंडेशनचे पियुष ओस्तवाल , विजय कटारिया, विपुल मुनोत, दिनेश कोठारी,अमोल ललवाणी, रोनक पारख, जितू संकलेचा, प्रतिक लोढा, कांग्रेस चे अध्यक्ष गोकुळ पाटिल,धनगर अण्णा पाटिल, नगरसेवक मनोज पाटिल, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, पुंडलिक तुळशीराम बडगुजर खडके सरपंच ,खाउशी चे अरुण देशमुख,डॉ.प्रशांत देवरे, डॉ.रविंद्र जैन,श्री.सुधाकर पवार,अरुण पुंडलिक पाटिल,जाकीर शेख,प्रदीप गोसावी,महेंद्र जैन,संजय काटे, ज्ञानेश्‍वर पाटिल,राजेंद्र नवसारीकर, एस.एम.पाटिल आदिंसह ग्रामिण भागातून शेतकरी मोठ्या संख्येने आज सहभागी झाले होते. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनीही आज आंदोलन स्थळी थांबून वेळोवेळी मार्गदर्शन केले. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिला.

पहा- पाडळसरेच्या संघर्षाला मिळणार्‍या पाठींब्याबाबतचा हा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content