मुंबईत उद्या पोलीस साहित्य संमेलन

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी दक्ष पोलीस साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने दक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९ चे उदघाटन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलिसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी ९.३० वाजता हे साहित्य संमेलन सुरू होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अशोक बागवे, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची या संमेलनास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पोलिसांमध्येही साहित्यिक, कवी, लेखक लपलेला असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास दक्ष असणार्‍या पोलिसांमधील हे साहित्य गुण समाजासमोर यावेत, यासाठी हे संमेलन होणार आहे. पोलिसांमधील साहित्यिकाला दाद देण्यासाठी त्यांच्या गुणांना वाखाणण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content