दुचाकी मोर्चाच्या नियोजनासाठी भुसावळात शिवसेनेची बैठक

भुसावळ प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या धोरणांविरूध्द आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या दुचाकी मोर्चाच्या नियोजनासाठी येथे शिवसेनेची बैठक घेण्यात आली.

रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक घेण्यात आली. यात केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध शिवसेनेने भव्य मोटारसायकल मोर्चा काढण्याचे नियोजन केले. कृषी विधेयकास विरोध म्हणून १६ ते १७ विषय हातात घेऊन रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुक्यातून मोटारसायकल मोर्चा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे मंत्री तसेच ज्येष्ठ शिवसेना नेते उपस्थित राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या बैठकीला तालुकाप्रमुख समाधान महाजन, नीलकंठ फालक, प्रा.धीरज पाटील, बबलू बर्‍हाटे, दीपक धांडे,अ‍ॅड. श्याम गोंदेकर, अ‍ॅड. कैलास लोखंडे, निर्मल दायमा, देवेंद्र पाटील, अबरार ठाकरे, पवन नाले, नरेंद्र लोखंडे, सोनी ठाकूर, गोकुळ बाविस्कर, मनोज पवार, मेहमूद शेख, पिंटू भोई, सुरज पाटील, मोहसीन तडवी, प्रदीप भुसार, आमिर पठाण, नबी पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत दीपक धांडे यांच्यासह नीलकंठ फालक, अ‍ॅड. कैलास लोखंडे, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. श्याम गोंदेकर यांनी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन देवेंद्र पाटील यांनी केले तर आभार बबलू बर्‍हाटे यांनी मानले.

Protected Content