खडकी सिम गावातून तरूणाची दुचाकी लांबविली; मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकी सिम गावातून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ मे रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीला आली. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी दुपारी ३ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, निंबा उत्तम पाटील वय-३० रा. खडकी सिम ता. चाळीसगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ४ मे रोजी रात्री ८ वाजता त्यांनी त्यांची दुचकी क्रमांक (एमएच १९ डीसी ७०२४) ही घराच्या समोर पार्कींगला लावलेली होती. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये‍ किंमतीची दुचाकी चोरून नेली. ही बाब दुसऱ्या दिवशी रविवार ५ मे रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवार ७ मे रोजी दुपारी ३ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन सोनवणे हे करीत आहे.

Protected Content