महत्वाची बातमी : शेतकर्‍यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार- उर्जामंत्री

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील ज्या शेतकर्‍यांनी वीज बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तूर्तास थांबवण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली आहे. यामुळे लक्षावधी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे महावितरणने राज्यभरात धडक मोहिम सुरू केली आहे. यात घरगुती, कृषी आणि औद्योगिक ग्राहकांकडून वसुली करण्यात येत आहे. तर थकबाकी न भरणार्‍यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, कृषी थकबाकीची वसुली मोहिम देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नाराजीचा सूर होता.

या पार्श्‍वभूमिवर, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्याची मोहिम तूर्तास थांबविण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील लक्षावधी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी मार्च महिन्याच्या अखेरीस थकीत वीज बिले भरण्याची मुदत असल्याने अनेक शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. आता मात्र उर्जामंत्र्यांच्या घोषणेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

Protected Content