इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

उल्हासनगर । येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून याखाली दाबले गेल्याने सहा जणांना मृत्यू झाला असून अजून काही जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

उल्हासनगरातील कॅम्प २ मधील साई शक्ती या चार मजली इमारतीचा स्लॅब रात्री उशीरा अचानक कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स आहेत. दुर्घटनेचं वृत्त समजताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असून, ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.