‘त्या’ निविदेची मुदत वाढवा- पल्लवी सावकारे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कामासाठीच्या निविदेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपच्या सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात स्पर्धात्मक निविदा भरण्यासाठी केवळ ५ दिवसांची मुदत असून त्यात तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांना पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे निविदेची मुदत १० ते १२ दिवसांपर्यंत वाढवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेत संबंधित कामाचे कंत्राट काढण्यापूर्वी यंत्रणेमार्फत संबंधित कंत्राटदाराला सर्व अटी-शर्ती, निविदा यांची माहिती पुरवली जाते. निविदा काढण्याची तारीख देखील आधीच सांगितली जाते. त्यानंतर कमी दिवसांची मुदत देऊन निविदा काढली जाते. ज्यांना कंत्राट मॅनेज करून द्यायचे आहे, त्याखेरीज अन्य कंत्राटदार दिलेल्या मुदतीत अर्टी-शर्ती पूर्ण करू शकत नाही. बहुतांश निविदा मॅनेज केल्या जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतून मिळाली आहे. यामुळेच आपण संबंधीत निविदेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केल्याची माहिती सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे.

Protected Content