आमोदा फाट्याजवळून तरूणाची दुचाकी लांबविली; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव रस्त्यावरील आमोदा फाट्याजवळून तरूण शेतकऱ्याची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिल जनार्दन सोंळके (वय-३२) रा. कोळ न्हावी ता. यावल हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कामाच्या निमित्ताने सुनिल हा (एमएच १९ बीआर ४४६९) दुचाकीने गावाजवळ असलेल्या विदगाव रोडवरील आमोदा रस्त्यावर कामाच्या निमित्ताने आला. त्यावेळी रस्त्यावर त्याचे दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विलास शिंदे करीत आहे.

Protected Content