महिलांच्या रोजगारासाठी जिल्ह्यात कापडी पिशवी निर्मितीचे ३ प्रकल्प

भुसावळ, प्रतिनिधी । महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन विभाग यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर तालुक्यात राबविला जात आहे. बचत गटातील महिलांसाठी कापडी पिशवी युनिटही सुरु करण्यात आले आहे.

जिल्हातील बचत गटातील महीलासाठीं कार्यरत साधन केंद्राच्या माध्यमातून तिन्ही तालुक्यात कापडी पिशवी युनिट सुरु करण्यात आले असून इंडस्ट्रियल मशीन, कापड कटींग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीनचा पुरवठा करण्यात असलेला आहे. बचत गटातील महिलांना कोरोना कालावधीत रोजगार मिळावा ह्या उदेशाने महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे ( राज्यमंत्री दर्जा) ह्यांच्या मदतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ (मुंबई) यांच्याकडून या युनिटला काम देण्यात आले त्यांच्याकडून २० हजार कापडी पिशवी शिवून घेतल्या जाणार आहे.

जिल्हातील 3 युनिटमधील 90 महिलांकडून पिशव्या शिवून घेण्यात येणार आहे बुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधुन हा उदघाटन सोहळा कोरोनामुळे मोजक्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता त्यांना 4 रुपये प्रतिपिशवी मोबदला मिळणार आहे.

हे तिन्ही युनिट लवकरात लवकर सुरू करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन विभाग स्टाफकडून मदत मिळाली.जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचीपण वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभले सर्वांचे आभार बचत गटातील महिलांनी मानले आहे, असे जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक यांनी कळवले आहे.

Protected Content