वाकडी येथे गारपीटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा (व्हिडीओ)

चाळीसगाव जीवन चव्हाण । शहरासह तालुक्यात २० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात रब्बी हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वाकडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाईव्ह ट्रेंड्सने व्यथा जाणून घेतल्या.

चाळीसगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिके जसे ज्वारी, हरभरा, गहू व मक्का कापणीला आहे. मात्र शनिवारी २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास  अवकाळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. तालुक्यातील ज्या भागात गारपीट झाली होती. त्यातील तालुक्यातील वाकडी येथे जाऊन लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरोनामुळे अगोदरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली असताना. आता अवकाळी पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून आर्थिक मदत मिळवून देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. तसेच काही भागात गारपीट झाले आहेत. जोरदार वादळात दुचाकीवर झाडे उन्मळून पडले आहे. 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/146512754038381

 

Protected Content