प्रसिध्द शिल्पकार योगीराज अरूण यांची मूर्ती राम मंदिरात ठेवली जाणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राम मंदिरातील प्रभु रामाची मूर्ती निश्चित झाली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली राम लल्लाची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होईल.

योगीराज अरुण हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. योगीराज शिल्पी यांनी वाडिया घराण्याच्या राजवाड्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वाची शिल्प उभारल्याचं सांगितलं जातं. योगीराज अरूण हे ३७ वर्षांचे असून त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यांनीच इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंच पुतळा बनवला आहे

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात येणार होती. अखेर प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली मोहक मूर्ती निवडण्यात आली आहे. योगिराज अरुण यांच्या आई सरस्वती यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

Protected Content