गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची यावल भाजपाची मागणी

यावल  प्रतिनिधी ।  राज्याचे भ्रष्टाचारी व  खंडणीखोर गृहमंत्री   देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावल तालुका भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे आज करण्यात आली आहे .

या संदर्भात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे सणसणीत आरोप करीत म्हटले आहे की , गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला सांगीतले की तुम्ही प्रति महीन्याला मला १०० कोटी रुपये जमा करून द्यावे , असे असले तर ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही  गृहमंत्री अनिल देशमुख हे खंडणीखोर असुन त्यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकारी नाही त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा , गृहमंत्री यांनी राजीनामा न दिल्यास भाजपच्या वतीने  आंदोलन छेडले जाईल

या प्रसंगी तहसीलच्या संजय गांधी निराधार योजना  विभागाच्या सौ.भारती भुसावरे यांना व महसुल कर्मचारी पराग सरोदे, सुरज जाधव यांच्या उपस्थितीत दिलेल्या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश  फेगडे , जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण  सभापती रविन्द्र  पाटील , जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी , जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील , यावल पंचायत समितीच्या सौ .पल्लवी चौधरी , जिल्हा परिषद सदस्या  सविता भालेराव , पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे , भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , कृउबाचे उपसभापती उमेश पाटील , योगीराज बऱ्हाटे यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत .

 

Protected Content