अजित पवारांशी मतभेद नाहीत — खा . सुप्रिया सुळे

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि आपल्यात कोणतेच मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित  दूर-संवादमालिकेत  सुळे यांनी पवार कुटुंबाची राष्ट्रवादीत मत्तेदारी नसल्याचंही स्पष्ट केलं.

 

अजित दादा आणि सुप्रिया ताई यांचा ताळमेळ कसा लावावा?, सुप्रिया आणि अजितचं फारसं चांगलं नाही असं लोकांना खूप आवडतं चर्चा करायला. त्यावर तुम्हाला भाष्य करायचं झाल्यास काय म्हणाल, असा प्रश्न ‘सुप्रिया सुळेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया यांनी, “एक तर हे खूप हस्यास्पद आहे. खूप गुळगुळीत विषय आहे हा. मागच्या १४ वर्षांपासून मी खासदार आहे पण कुठल्या धोरणांवर दादाचं आणि माझं वेगळं मत आहे ही चर्चा कुणी पाहिलेलीय, बघितलीय याचा काही डेटा नाहीय. दादाचं आणि माझं वेगळं मत आहे पण कोणत्या गोष्टीवर याला काही डेटा उपलब्ध नसून एकाच विषयाचं गॉसिप किती दिवस करणार?” असा प्रश्न उपस्थित केला.

 

सुप्रिया यांनी अजित पवार यांचा अनुभव माझ्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं. “एक तर तो माझा मोठा भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठाय. अनुभव, प्रशासनातील काम त्याचं माझ्यापेक्षा जास्त आहे,” असं सुप्रिया म्हणाल्या. पुढे सुप्रिया यांनी आम्ही एक टीम म्हणून काम करतो, असं स्पष्ट केलं. इतर राजकीय कुटुंबांमध्ये काही झालं तर आमच्याकडे झालं पाहिजे असं आहे का?, असा उलट प्रश्न सुप्रिया यांनी भावा बहिणीमध्ये वाद असल्याची चर्चा करणाऱ्यांना विचारला. दादा आणि मी, आम्हाला अमुक पद पाहिजे इतक्या कोत्या मनोवृत्तीने आम्ही कधीच विचार करत नाही, असंही सुप्रिया म्हणाल्या ५५ वर्षांपासून अनेक कार्यकर्ते, कुटुंबांनी शरद पवारांसोबत संघर्ष केलाय. त्यामुळे या पक्षातील भागिदार ही जबाबदारी आमची नाहीय का? एका संघटनेत काम करतो तेव्हा केवळ मी, मला, माझं असा विचार करता येऊ शकत नाही, असंही सांगितलं.

 

वैयक्तिक महत्वकांशांमुळे काहीजणांचा गोंधळ होऊ शकतो. पण माझ्यात आणि दादामध्ये कोणतेही मतभेद नाहीय. आता आम्हाला या वयात समज नसेल तर शेम ऑन अस, असं म्हणत सुप्रिया यांनी आपलं मत मांडलं.

 

पवार कुटुंबाची मत्तेदारी होऊ शकतं नाही. ते चुकीचं ठरेल असं सुप्रिया म्हणाल्या. विचारांची नाळ ही यशवंतराव चव्हाणांपासून आहे. आजही मानसपुत्र म्हणून पवारसाहेबांना ओळखलं जातं. आमच्या पक्षात चांगलं टॅलेंट पूल आहे, असं सुप्रिया यांनी सांगितलं.

 

Protected Content