चोपडा येथे श्री रोकड बालाजी शोभायात्रा उत्साहात (व्हिडीओ)

chopada balaji

चोपडा प्रतिनिधी । शहरातील ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या मूर्तीची स्थापना मंगळवारी (दि.15) दुपारी करण्यात आली असून श्री रोकड बालाजी भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेत भगवे फेटे परिधान केले लेझीमपथकाने सर्वांचे लक्ष वेधले.

गांधी चौकात श्री रोकड बालाजी मंदिरात मूर्तीची पाद्यपूजा करीत रोजी दुपारी शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. श्री बालाजी यांची पाच फुटी भव्य पाषाण मूर्ती यात्रेत अग्रभागी ठेवण्यात आली होती. गांधी चौकातून शोभायात्रेस सुरुवात करत शहरातील प्रमुख मार्गावरुन यात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात शोभायात्रा आल्यानंतर समिती मार्गदर्शक घनःश्याम अग्रवाल व सरोजजी अग्रवाल यांनी महाआरती करीत यात्रेचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

माता-भगिनींची लक्षणीय उपस्थिती
शोभायात्रेत बालिकांच्या लेझीम पथकांसह महिलांनीही पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच अकुलखेडे येथील श्री लक्ष्मीनारायण भजनी मंडळ समूहाने आपल्या भक्तिगीतांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

जलाधिवास उत्साहात
सुरुवातीस श्री बालाजी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी प्रधानाचार्य हरिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदांनी देवता स्थापित करीत मूर्तीचा जलाधिवास विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. उद्या (दि.१७) सकाळी यज्ञकर्म, स्नपन, धान्यधिवास, शय्याधिवास हे विधी करण्यात येतील, अशी माहिती मंदिर समितीचे विश्वस्त पंडित अशोक महाराज, पंडित आलोक महाराज यांनी दिली आहे.

पहा : श्री रोकड बालाजी शोभायात्रेचे काही क्षण

Protected Content