ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी खासदार पाटील यांची बॅंकेत धडक (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 17 at 6.08.44 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसापासून सेंट्रल बँकेच्या कजगाव (ता.भडगाव )शाखेत इंटरनेटसह अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत असून त्यांनी याबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे तक्रार केल्यावर खासदार पाटील यांनी कजगाव शाखेत जाऊन व्यवस्थापक यांना जाब विचारला.

सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेतील ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे दुरध्वनीद्वारे तक्रार केली होतो. यातक्रारीची दखल घेत खासदार उन्मेश पाटील यांनी सरळ बँकेच्या कजगाव शाखेत नागरिकांसह धडक देत व्यवस्थापक कसबे यांना जाब विचारला. अनेक दिवसांपासून ग्राहकांना सात्यत्याने इंटरनेटसेवा, मुद्रा लोन आणि सेवा सुविधेबाबत माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. उद्याच्या उद्या सर्व अडचणी दूर करा अन्यथा आपणांस नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल असा दम भरला. सेंट्रल बँक महाव्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून लवकरात लवकर खातेदारांची अडचण दूर करावी, मुद्रा लोन संदर्भात तरुणाच्या अडचणी दूर कराव्यात जवळपासच्या चाळीस खेड्यातील मोठ्या प्रमाणात जेष्ठ ठेवीदार असतांना त्यांच्या अडचणीत दररोज वाढ होत असताना आपण आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला. याप्रसंगी नागरिकांनी देखील खासदार उन्मेश पाटील यांच्या समोर मॅनेजर कसबे यांचेवर प्रश्नाची सरबत्ती केली.

खासदार पाटील यांच्या धडाडीचे कजगाव परिसरात कौतुक

आमच्या अडचणी दूर करण्यासाठी थेट खासदार उन्मेश पाटील यांनी बँकेत धडक दिली याचे उपस्थित सर्वच ग्राहकांनी फार कौतुक केले. जेष्ठ नागरिकांनी उन्मेश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्या अडचणी दूर केल्या बद्दल धन्यवाद दिलेत. यावेळी शेकडो नागरिकांनी खासदार पाटील यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.

Protected Content