मी सध्या तीनचाकी सरकार चालवतोय – उद्धव ठाकरे

udhdhav thakarey

मुंबई, वृत्तसंस्था | मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीनचाकी कार नाही पण सरकार चालवतो आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विरोधकाकंडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना हे तीनचाकी सरकार असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो.

 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केल्याने ही टीका वारंवार केली जात असून, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही असा वारंवार दावा विरोधक करताना दिसतात. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टिकेला उत्तर दिले आहे. ३१ व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, “आमच्यावर तीनचाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी…पण आमचे सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचे आहे. समतोल जमला पाहिजे मग दोन चाके असो किंवा तीन चाके असो”. चार चाके असूनही आपटायचे ते आपटले आहेत. असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचे असते. ते खरे नियंत्रण करत असते. त्या चाकावर गाडी चालत असते. त्या चालवणाऱ्याला सगळे नियम सांगणे महत्त्वाचे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Protected Content