Home Cities भडगाव शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर, अखिलेश पाटील तालुकाध्यक्ष

शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर, अखिलेश पाटील तालुकाध्यक्ष

0
3

भडगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी रविवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह, भडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तालुकाध्यक्ष अखिलेश रविंद्र पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

या विशेष बैठकीला शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, चाळीसगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील आणि लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये भडगाव तालुका उपाध्यक्षपदी वाल्मीक प्रभाकर लोखंडे (बांबरुड प्र. उ.) व धनराज तुकाराम पाटील (पिचर्डे), कार्याध्यक्षपदी सतीश युवराज पाटील (गोंडगाव), तर सचिवपदी डॉ. योगेश युवराज गोसावी (वाडे) यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

त्याचप्रमाणे सरचिटणीसपदाची जबाबदारी सरदारसिंग जयसिंग पाटील (वडधे), समाधान भगवान पाटील (वाक) व रामकृष्ण जगन्नाथ माळी (वाडे) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या संघटकपदी संजय केशव खैरनार (बांबरुड प्र. उ.) यांची तर चिटणीसपदी योगेश शालिक पाटील (बांबरुड प्र. उ.) व गणेश राजेंद्र जावरे (बात्सर) यांची निवड करण्यात आली. यासोबतच ज्येष्ठ संघटक म्हणून संजय वेलजी पाटील (पिचर्डे) व प्रकाश कोतकर यांची तर सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

युवा वर्गाला चळवळीत सक्रिय करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचीही तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी लिलाधर कल्याणराव पाटील (वाक), उपाध्यक्षपदी सागर माधवराव पाटील (बांबरुड), सचिवपदी योगेश खुशाल पाटील (बात्सर), संघटकपदी विकी योगराज पाटील (वाक) तर सरचिटणीसपदी नरेंद्र संभाजी पाटील (वाक) यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात पीक नुकसान भरपाई, अतिवृष्टीचे पंचनामे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि प्रशासनाकडून शेतकरी प्रश्नांची तडजोड करून घेणे यासाठी संघटितपणे आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound