‘त्या’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही : भाजपाचे स्पष्टीकरण

book publication

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी स्पष्ट केले आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर त्यांची प्रतिक्रिया ट्विट करण्यात आली आहे.

 

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद देशभरात रंगला आहे. आता याबाबत भाजपाने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नाही, असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर जयभगवान गोयल यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, ते मी हेतूपुरस्सर केले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन एवढा वाद निर्माण होण्याची गरज नाही, असेही मयुख यांनी म्हटले आहे.

Protected Content