अडावद नूतन विद्यालयात कला महोत्सव

WhatsApp Image 2020 01 13 at 7.09.42 PM

अडावद, प्रतिनिधी | येथील नूतन ज्ञान मंदिर माध्य व उच्च माध्य विद्यालयात संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वा. सै. कै. पं. ध. थेपडे यांच्या स्मृती समारोह निमित्त ‘रंग तरंग’ या वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, तर उद्घाटक म्हणून पंकज राणीदानजी चांडक तसेच त्यांचे सुपुत्र आयान चांडक हे उपस्थित होते. मुख्य अतिथी आमदार लता सोनवणे, डॉ. केदार थेपडे (चेअरमन ब. ग. वि. नि.), सुशीला चांडक, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, शांताराम पाटील, डॉ. अरूण कुमार कोठारी, डॉ. सुभाष कासट, पुनीत काबरा, मुख्याध्यापक आर. जे. पवार, संस्थेचे समन्वयक एस. एस. जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. जे. पवार यांनी केले. अरूणभाई गुजराथी यांनी ७८ वर्षापूर्वीच्या घडामोळींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपले यशोशिखर गाठावे व संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांचे राष्ट्रप्रेम व जनसेवा हे गुण घ्यावेत असा संदेश देऊन विद्यार्थ्यांना व विद्यालयाला शुभेच्छा दिल्या. तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. केदार थेपडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक नृत्य ,कॉमेडी डान्स, ललाटी भांडार, स्त्री भ्रूण हत्या, मोबाइल साइड इफेक्ट नाटिका व रिमिक्स पब्जी डान्स तसेच कार्यक्रमाचा शेवट शहीद झालेल्या सैनिकांना व कै. स्वा. सै.पं. ध. थेपडे यांना मानवंदना श्रद्धांजली देत गाण्याच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला सरपंच भावना माळी, भारती महाजन, मदेवराव पाटील(सरपंच वडगाव), जितेंद्रकुमार शिंपी, गणेश सिंग परदेशी, दिनकर देशमुख, साखरलाल महाजन, एम. के. शेटे, डी. एम. शिंदे, आर.जी.लोखंडे, एस. बी. सोनार, एस. एन. कुलकर्णी, या. गो. सोनार यासह आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन के. आर. कंखरे, सी. जी. परदेशी, सारिका बोरसे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर बंधु भगिनी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content