अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी निवडणूक उत्साहात

 

fd98e77b 1068 42fc 8705 45513d8e86fd

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. या अनुषंगानेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या हेड बॉय व हेड गर्ल पदासाठी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने आणि संविधानाला अनुसरूनच घेण्यात आली.

यावेळी प्राचार्य विकास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया घोषीत झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच अर्ज भरणे, मुलाखती, माघार, चिन्हवाटप या घटकांचा प्रामुख्याने समावेश होता. यानंतर उमेदवारांना प्रत्येक वर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली होती. या काळात उमेदवारांनी मतदारांना कुठलेही आमिष दाखऊ नये, म्हणुन आचारसंहिता लागु करण्यात आली होती. यानंतर मतदानाच्या दिवशी एका सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. यात मतदान केंद्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी मतदार रांगेत उभे होते. आत प्रवेश केल्यानंतर यादीत नाव व ओळखपत्र म्हणुन शाळेचे आयकार्ड पाहिल्यानंतर बोटाला शाही लावली जात होती. त्यानंतर गुप्त पद्धतीने बॅलेट पेपरवर उमेदवाराच्या नावापुढे खुन करून मतदान करण्यात येत होते. दुसऱ्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यात हेड बॉय पदासाठी देवेंद्र शिवकुमार पाटील व हेड गर्ल पदासाठी सोनम प्रदिप वर्मा यांची निवड घोषीत करण्यात आली.

सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.शाम पाटील, संचालक पराग पाटील, संचालिका देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी अभिनंदन केले. हि प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Protected Content