प्रताप महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

 

 

610569c5 704f 4a5c bb3d 219d9b1a9041

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयात युवती सभेंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.ज्योती राणे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींना अभ्यासेत्तर उपक्रमात मोकळेपणाने सहभागी होण्यास प्रवृत्त करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागातर्फे युवती सभेत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा योजना महाविद्यालयात राबविली जाते. विविध महाविद्यालयातुन एकूण ५० विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यशाळेत चार सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रा.डाँ.सौ. वंदना पाटील, आर.एल.काँलेज, पारोळा, डॉ. बिराज मुठ्ठे नेत्ररोग तज्ञ, अँड.निकम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जिल्हा विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पवन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या चारही सत्रामध्ये युवतींची अभिव्यक्ती आणि व्यक्तीमत्व विकास, जिवनमूल्ये, युवतींना कायद्याचे मार्गदर्शन, नेत्र आरोग्य व काळजी, यशाचे गमक- आत्मविश्वास अशा विविध विषयांना स्पर्श करून सात तास विद्यार्थिनींना मनोरंजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. शैलजा माहेश्वरी, प्रा.डॉ. वैशाली पाटील, जयश्री बोरसे, प्रा. ललिता पाटील, प्रा. योगिनी चौधरी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. विजय मान्टे, सहाय्यक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप नेरकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन युवती सभा समन्वयीका प्रा. नलिनी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. हेमलता सुर्यवंशी यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकांचे सहकार्य लाभले.

Add Comment

Protected Content