Home Cities जळगाव रावेरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आंदोलन ( व्हिडीओ )

रावेरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आंदोलन ( व्हिडीओ )

0
117


जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात आले आहे.

रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. आता रणधुमाळीला प्रारंभ होत असतांना ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. काँग्रेस भवनासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. या आंदोलनामध्ये जाकीर बागवान, अरूणा पाटील, दीपक बाविस्कर, परवेज पठाण, शाकीर खान, अफजल खान आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

पहा : काँग्रेस कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय आहे ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound