आमदार जावळे यांची डोंगरदे येथे भेट

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरदे येथे अज्ञान आजाराने तीन बालके दगावली असून आज आमदार हरीभाऊ जावळे यांनी या गावाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली.

तालुक्यातील डोंगरदे या आदीवासी गावात गेल्या ८ दिवसापासुन अज्ञात आजाराने तिन मुली दगावली असून , आरोग्य विभाग या संपुर्ण गावावर लक्ष ठेवुन आहे. दरम्यान आज रावेर विधानसभा क्षेत्र चे आमदार हरीभाऊ जावळे यांनी डोंगरदे गावाला भेट देवुन आदीवासी बांधवांच्या अडीअडचणी व समस्या जाणुन घेतल्या. लहान मुलं मरण पावल्याची ही दुदैवी घटना असल्याचे सांगुन आदीवासी बांधवानी आपल्या उपचारा साठी आलेल्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांना मदत करण्याचे आवाहन आमदार जावळे यांनी केले. त्यांच्या सोबत जि.प. सदस्य हर्षल पाटील, डोंगर कठोरा येथील सरपंच सौ सुमन वाघ गणेश पावर रामा पावरा रबिल तडवी उपसरपंच नितीन वेरूळ ग्रा.स. यदुनाथ पाटील, दिगंबर खडसे, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे आदींसह कार्यकर्ते होते.

डोंगरदे या गावाला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन टँकर व्दारे तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्या तीन बालकांचा मृत्यु मात्र कशामुळे झाला आहे हे निदान अद्याप आरोग्य विभागा कडुन स्पष्ट झाले नसल्याचे दिसुन येत आहे, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी त्या मरण पावलेल्या पिंकीता हेमराज पावरा, चेतन जितु पावरा आणी गौरव सुकलाल पावरा अशी त्यांची नांवे असुन त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आमचे बाळ हे लसीकरणाचे डोस देण्या अगोदर निरोगी होती. मात्र डोस दिल्यानंतर त्यांना अचानक, ताप येवु लागले, वांत्या आणी संडासी होवु लागल्या. यानंतर ही बालके दगावली.

मात्र, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बर्‍हाटे यांनी व आरोग्य विभागाच्या इतर अधिकारी वर्गा कडुन नकार करण्यात आला आहे. गावातील काही लहान देखील अशाच प्रकारे आजारी पडल्याची माहिती गावाचे समाज पोलीस पाटील आमीरा सकर्‍या पावरा यांनी दिली आहे. यामुळे संबंधीत बालकांच्या मृत्यूचे गुढ वाढल्याचे दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content