महाजन इंग्लिश स्कुल मध्ये दिवाळी निमित्त कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ.किरण खेट्टे तसेच प्राचार्य रंजना महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी गाय वासरू पूजन धनत्रेश लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. वसुबारस याची माहिती मनीषा पाटील धनत्रयोदशीची माहिती सरोज येवले यांनी तर पारंपारिक लक्ष्मीपूजनाची माहिती अर्चना पाटील आणि बलिप्रतिपदा याविषयीची माहिती श्रद्धा तसेच भाऊबीज विषयीची माहिती लता इंगळे यांनी मुलांना दिली.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस स्कुलच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री स्व. जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका दिपाली धांडे यांनी तर आभार प्रदर्शन सिमरन तडवी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता शाळेतील शिक्षका व शिक्षेतर कर्मचारी सहकार्य लाभले.

Protected Content