चाळीसगाव शहरातील २० कोटींच्या कामांना मंजुरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने शहरासाठी तब्बल २० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी २० कोटी रुपयांचा निधी नवीन रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झाला आहे. त्यात शहरातील महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन या कामासाठी ६ कोटी, प्रभाग क्र.१ मधील शिवपार्वती नगर, रामकृष्ण नगर, माधव नगर, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्त्यांना एकूण ९ कोटी रुपये निधी, प्रभाग क्र.९ मधील हिरापूर रोड ते सुयश लॉन्स परिसरातील रस्त्यांना ५ कोटी निधी मंजूर झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल तसेच कोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामाचे १६ कोटींचे टेंडर देखील प्रकाशित झाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहर वासीयांना दिवाळी भेटच दिली आहे.

लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने चाळीसगाव शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. चाळीसगाव शहरातील महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत. येणार्‍या काळात अजून भरीव निधी आणून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प केला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केला आहे.

Protected Content