भुसावळात ५३ शिक्षकांना ‘प्रज्ञासूर्य पुरस्कार’ प्रदान

bhusaval 2

भुसावळ प्रतिनिधी । येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थातर्फे तालुक्यातील जि.प, न.पा तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित, शाळा, महाविद्यालय, तंत्र व अभियांत्रिकी, वैद्यकीय महावियालयातील ५३ शिक्षकांना नुकतेचे ‘प्रज्ञासुर्य गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर ताप्ती एजुकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश फालक यांना प्रज्ञासुर्य शिक्षणमहर्षी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुल्याधारित शिक्षण ही काळाची गरज असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभु शास्त्रीजींनी अध्यक्षीय भाषणात सांगितले आहे. याचबरोबर अनिल झोपे व महेंद्र धिमते यांनी शिक्षक हा समाजव्यवस्थेचा कणा असल्याचे मनोगतातून सांगितले. शिक्षकांच्या वतीने प्रतिनिधक स्वरूपात सेंट्रल रेल्वेस्कूलचे उपप्राचार्य सतीश कुलकर्णी ह्यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमातील वृंदा व थोरवी महाजन ग्रृपचे बहारदार नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामिनारायण मंदिर भालोदचे कोठारी प्रभु शास्त्री, तर प्रमुख मान्यवर म्हणुन नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उपप्राचार्य अनिल झोपे, जेष्ठ शिक्षक अरुण मानडळकर, जयगणेश जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकर जावळे, भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते, संस्था अध्यक्ष डॉ. मधु मानवतकर, डॉ.राजेश मानवतकर यांच्यासह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष डॉ. मधु मानवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशिर जावळे तर आभार प्रदर्शन राजेश्री सुरवाडे यांनी मानले आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दीपक मानवतकर, वरुण मांडळकर, डॉ.प्राजक्ता, मनोज यादव, कृपा महाजन, किरण तायडे, दामिनी पाटिल, शैलेश गायकवाड, राजेश सपकाळे, नितिन काकडे, इमरान शेख, गणेश शिंदे, संतोष मोर्या आदींनी अथक परिश्रम घेतले आहे.

Protected Content