गुजरातचे मुख्यमंत्री उद्योगपतींना आकर्षित करताय ही तर लूट : संजय राऊत

मुंबई वृत्तसंस्था | भाजप नेते आशिष शेलार यांनी ममता बनर्जी यांच्या मुंबई भेटीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘रोड शो करत गुजरातचे मुख्यमंत्री ‘मुंबईतील उद्योगपतींना आकर्षित करताय हीच तर खरी लूट आहे” असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असतांना “ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना?” असा खोचक सवाल करत टीका केली होती. यावर ‘रोड शो करत गुजरातचे मुख्यमंत्री ‘मुंबईतील उद्योगपतींना आकर्षित करताय’ ही तर खरी लूट आहे” असा पलटवार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या’ असं जे आज म्हणत आहेत ते अनेक उद्योग, अनेक प्रकल्प मुंबईतून गुजरातला नेण्यात आले त्यावेळी का गप्प होते? असा सवाल करत, “त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल महाराष्ट्रात येऊन ‘मुंबईत काय ठेवलंय गुजरातला चला’ असं म्हणतात. योगी आदित्यनाथ इथे येऊन, ‘सिने उद्योग लखनऊ येथे घेऊन जाणार’ म्हणतात.” ते भाजपा नेत्यांना चालतं मात्र ममता बॅनर्जी आम्हाला भेटल्या ते मात्र त्यांना सहन होत नाही यावरून भाजपचं बेगडी असलेलं मुंबई प्रेम लक्षात येतं” असं ते म्हणाले.

शरद पवार व ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले, “यूपीए किंवा एनडीए याबरोबरच कुठलीच आघाडी सक्रीय नाही त्यामुळे शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या माध्यामतून समर्थ पर्याय उपलब्ध होत असेल तर ते चांगलच आहे.” असं त्यांनी सांगितलं.

Protected Content