हक्काचा प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे – माजी आ. शिरीष चौधरी (व्हिडीओ)

yawal news 1

यावल, (प्रतिनिधी)। विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणूक तोंडावर येवुन ठेपली असुन, सर्व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर प्रत्येक व्यक्तिपर्यंत जावुन आपल्या हक्काचा प्रतिनिधी या निवडणुकीत निवडुनआणण्याचा असेल तर आपल्यासाठी एक एक मत हे महत्वाचा असणार,असे माजी आमदार शिरिष चौधरी यांनी केले. यावल तालुक्यातील कोळवद येथे झालेल्या कार्यकर्ता बुथ कार्यशाळाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या संयुक्त कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

देशातील आणी राज्यातील शासनाच्या कारभारामुळे देशाची आर्थिक अवस्थाही अत्यंत बिकट झाली असुन, शेतकरी आणी सर्वसामान्य नागरीकांना केवळ शासनाकडुन निव्वळ आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळालेली नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे की राज्याचा कारभार चालविण्यासाठी आपल्या राज्य शासनाला २० हजार कोटीचे कर्ज घ्यावे लागत असुन, आपल्या तालुक्यातील व परिसराची जल पातळी हे खालवली असुन, हजार कोटी रुपयांचा मेगा रिर्चाज प्रकल्पच्या नावांखाली नुसता पुतळा सोडयाचा म्हणजे झाले, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मेगा रिर्चाज प्रकल्य कधी पुर्ण होईल यात शकांच आहे, काल परवा काही बदनामीकारक फलक बाजी करणारे बाहेरून आलेले पाहुणे लोकप्रतिनिधी म्हणतात आपण यांना पाहीलंत का ? आता या मंडळींना आपण चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी कुणाची कशी आहे हे आपण चांगल्या प्रकारे ओळखतो असे सांगुन फलकाचे राजकारण करणाऱ्यांचा खरपुस समाचार मा. आ.शिरीप चौधरी यांनी घेतले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राकेश तळेले, पं.स.गटनेते शेखर पाटील, युवक राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटील नाना बोदडे, मसाका संचालक भागवत पाचपोळ, अनिल महाजन, गोवर्धन बोरोले, हाजी तडवी गुरुजी, यावल शहराध्यक्ष कदीर खान यांच्यासह मोठया संख्येने यावेळी ग्रामस्थ पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्तावीक प्रभाकर सोनवणे यांनी केले तर आभार शेखर पाटील यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, विलास चौधरी, प्रमोद भिरूड, बशीर तडवी, महेन्द्र धांडे आदीनी परिश्रम घेतले.

Protected Content