जळगाव महापालिका २५३ कोटी भरून झाली हुडको कर्जमुक्त

जळगाव, प्रतिनिधी |  आर.टी.जी.एस. पध्दतीने हुडको वित्तीय संस्थेच्या खात्यावर एक रकमी परतफेड करत २५३ कोटी ८३ लाख ३८ हजार रुपये वर्ग केल्याने महापालिका आज खऱ्या अर्थाने हुडको कर्जमुक्त झाली आहे.

 

हुडको कर्ज परतफेडीसाठी राज्य शासनाकडून २५०  कोटी ८३  लाख ३८ हजार रुपये महापालिकेस प्राप्त झालेत. या रकमेत महापालिकेने फेडीकामी उर्वरित रक्कम ३ कोटी मिळवून रुपये २५३  कोटी ८३ लाख ३८  हजार रुपयांचे आरटीजीएस हुडको वित्तीय संस्थेस दिलेत. त्यामुळे आजपासून जळगाव महापालिका हूडकोच्या कर्जातुन मुक्त झालेली आहे अशी माहिती.महापौर सिमा भोळे यांनी दिली.  या सर्व कार्याचे श्रेय महापौर भोळे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना दिलेत.

 

Protected Content